प्रेस मीडिया लाईव्ह ;
मुंबई | महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे. गेल्या आठ तासांच्या चौकशीनंतर मंत्री नवाब मलिकांना ईडीने अटक केले आहे. मलिकांना वैधकिय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात घेऊन ईडीचे अधिकारी रवाना झाले आहेत. या वेळी झुकेंगे नही, और भी लढेंगें, अशी प्रतिक्रिया मंत्री नवाब मलिकांनी ईडीच्या कार्यलयातून बाहेर येताना दिली आहे. मंत्री नवाब मलिकांच्या अटके नंतर त्यांच्या समर्थकांनी ईडी कार्यलया बाहेर जोरदार घोषणाबाजी केली.
Tags
मुंबई