नवाब मलिक यांच्या अटकेच्या कारवाई नंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई - महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक व कामगार मंत्री नवाब मलिक यांना ईडी बुधवारी आज अटक केली. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ईडीचे पोलीस मलिक यांच्या घरात घुसले. त्यांनी चौकशीसाठी त्यांना न्यायालयात नेले. तेथे आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांना महानगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने नवाब मलिक यांना तीन मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओक या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेण्यात आली . मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक झाली. या कारवाईने राज्य आणि केंद्र सरकारमधील संघर्ष तीव्र होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्या अटकेनंतर नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली. दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर यांची कोट्यवधीची मालमत्ता कवडीमोल किमतीने विकत घेताना मनी लॉंडरिंग करण्यात आले असावे, असा संशय ईडीला आहे.या मालमत्तांचा व्यवहार मनी लॉडरिंग कायदा लागू होण्यापुर्वीच्या काळातील आहे. त्या मुळे केवळ राजकीय आकसापोटी जुने व्यवहार उकरून काढून अटकेची कारवाई करण्यात येत असल्याचा दावा नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी न्यायालयात केला. तर हसिना पारकर हिचा साथिदार सलीम पटेल याने हसिना पारकर यांच्याकडून कुलमुखत्यार पत्र घेऊन हा व्यवहार केल्याचा दावा ईडीच्या वकिलांनी केला. मात्र हा सलीम पटेल आणि हसिना पारकर यांचा हस्तक सलिम पटेल या दोन वेगळ्या व्यक्ती असल्याचा दावा नवाब मलिक यांच्या वकिलांनी केला.
नवाब मलिक यांच्या अटकेच्या कारवाई नंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते .