प्रेस मीडिया ऑनलाइन :
मुंबई : दिग्गज पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचं रविवारी मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झालं, त्या ९२ वर्षांच्या होत्या. हिंदीसह ३६ हून अधिक प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली आहेत.संध्याकाळी साडे सहा वाजता त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या प्रभूकुंज निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आलं आहे.
लतादीदींचं पार्थिव शिवाजी पार्कवर पोहोचलं असून काही वेळातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
दिग्गज गायिका लतामंगेशकर यांच्या स्मरणार्थ कर्नाटक सरकारने दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.
"सर्व सार्वजनिक मनोरंजनाचे कार्यक्रम निषिद्ध आहेत आणि राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल," असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
गायिका लता मंगेशकरांच्या पार्थिव सोबत मंगेशकर कुटुंबीय. शासकीत इतमामत होणार अंत्यसंस्कार. अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी.
'प्रभूकुंज' बाहेर पोलिसांकडून लता दीदींना मानवंदना; पार्थिव शिवाजी पार्ककडे रवाना.
गायिका लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ पश्चिम बंगाल सरकार उद्या (७ फेब्रुवारी) अर्धा दिवस सुट्टी पाळणार आहे, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनी घोषणा केली आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल दुखवटा व्यक्त करण्यासाठी राज्य सरकारने सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं प्रभूकुंजवर जाऊन मंगेशकर कुटूंबियांची भेट घेतली आहे. यापूर्वी सचिननं ब्रीच कँडी येथे जावून लता मंगेशकरांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली होती. थोड़्यावेळानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील दीदींच्या निवासस्थानी दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे दर्शन आता सर्वसामान्य चाहत्यांना घेता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं मोठी तयारी केली आहे. शिवाजी पार्कवर हे दर्शन घेता येणार आहे. आतापर्यत वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे.
बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी लता दीदींच्या कुटूबियांची भेट घेतली आहे. त्यांच्या समवेत त्यांची मुलगी श्वेता बच्चन उपस्थित होत्या. आतापर्यत वेगवेगळ्या बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी भेट घेतली आहे. थोड्यावेळा पूर्वी संजय लीला भन्साळी यांनी देखील मंगेशकर कुटूंबियांची भेट घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच मुंबईकडे होणार रवाना. स्वतः मोदींनी ट्विटद्वारे दिली माहिती