प्रेस मीडिया ऑनलाइन :
मिरज तालुक्यातील टाकळी या गावी गायरान जमिनीवरील पारध्याच्या आठ ते दहा झोपडी वजा घरे जीसीपी द्वारे उध्वस्त करून सदर जागेवरील वनीकरण विभागाचे माध्यमातून लावलेली वेगवेगळ्या प्रकारची आठ ते दहा वर्षांची झाडे मुळासकट जीसीपी द्वारे काढून बाजूला सारून बेकायदेशीर पटांगण करणाऱ्या टाकळी गावच्या सरपंच व ग्रामसेवक यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती (अॅटॢसिटी ) कायद्यान्वये गुन्हा दाखल करणेत यावा. अन्यथा संस्थापक अध्यक्ष आयु नितिन गोंधळे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय ब्ल्यू पँथर प्रणीत पारधी सेना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र आंदोलन करेल ..
आंदोलन वेळी काही अनुचित प्रकार घडलेस त्यास आपले प्रशासन जबाबदार राहील याची प्रशासनाने नोंद घ्यावी असे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले . निवेदन देते वेळी भारतीय ब्ल्यू पँथर चे संस्थापक अध्यक्ष नितीन गोंधळे ,महाराष्ट्रा प्रदेश अध्यक्ष दलित मित्र सनातन भोसले , राष्ट्रीय कार्याध्यक्ष धनंजय खांडेकर , सांगली जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत ( बापू ) कोलप माआ,शरद पाटील इज्यूत भोसले ,पानेस पवार ,गवडा भोसले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते