प्रेस मीडिया लाईव्ह :
मिरज प्रतिनिधी : धनंजय हलकर (शिंदे)
हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ सांगली जिल्हाच्या वतीने दि १७/०२/२०२२ रोजी भव्य वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी जिल्ह्यातील विविध भागांमधून विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला या स्पर्धेमधून प्रथम,द्वितीय, तृतीय असे तीन क्रमांक काढण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी धनश्री दीपक पाटील, द्वितीय क्रमांक कुमार अर्णव रविकुमार हजारे, तृतीय क्रमांक कुमारी अक्षरा रूपनुर या स्पर्धकांनी हे यश संपादन केले व इतर स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सांगली शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मा.श्री पृथ्वीराज (बाबा)पाटील,व अ.भा. मराठा महासंघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष मा.अभिजीत (दादा) शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमावेळी अ.भा. मराठा महासंघाचे जिल्हा सरचिटणीस श्री किशोर धनवडे, जिल्हा उपाध्यक्ष श्री सतीश जाधव, जिल्हा खजिनदार श्री विजय शिंदे, जिल्हा विभागीय उपाध्यक्ष श्री शरद पवार, मिरज तालुका अध्यक्ष श्री अमोल पाटील, मिरज शहर अध्यक्ष श्री धनंजय (हलकर) शिंदे, मिरज शहर उपाध्यक्ष श्री महेश दाभाडे, मनोज जाधव, श्रीधर जाधव, महादेव पवार, विनायक ढेरे, राहुल आवळे, नितीन साळुंखे, व जिल्हा मधील अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते हा कार्यक्रम रंगशारदा हॉल मिरज येथे पार पडला.