सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापिका शांतिश्री धुलिपूडी पंडित यांनी इतिहास घडवला

 दिल्लीतील नामांकित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.

प्रेस मीडिया ऑनलाइन :

नवी दिल्ली : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील  प्राध्यापिका शांतिश्री धुलिपूडी पंडित यांनी इतिहास घडवला आहे. दिल्लीतील नामांकित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पुढील पाच वर्षांसाठी त्या या पदावर असतील. शांतिश्री पंडित यांच्या रुपाने विद्यापीठाला पहिल्या महिला कुलगुरू (Vice Chancellor) मिळाल्या आहेत. त्यामुळे पंडित यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जेएनयूचे कुलगुरू एम. जगदीश यांची नुकतीच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे कुलगुरूपद रिक्त झाले होते. आता जगदीश यांच्याकडून पंडित या आज कार्यभार स्वीकारतील. पंडित या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पॉलिटिक्स आणि पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन विभागात कार्यरत आहेत. मागील 29 वर्षांपासून त्या पुणे  विद्यापीठात आहेत.

पंडित यांनी 1988 मध्ये गोवा विद्यापीठातून अध्यापन कामाला सुरूवात केली. त्या 1993 मध्ये पुणे विद्यापीठात दाखल झाले. विद्यापीठातील विविध महत्वाच्या शैक्षणिक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहे. विद्यापीठ अनुदान आयोग आणि इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च (ICSSR) या संस्थांच्या सदस्य म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी आतापर्यंत 29 जणांना पीएचडीसाठी मार्गदर्शन केले आहे.

मद्रास मधील प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून त्यांनी इतिहास विषयात पदवी तर सामाजिक मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्या यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून सामाजिक कार्य विषयात पदविका मिळवली आहे. पंडित या जेएनयूच्याही विद्यार्थिनी आहेत. त्यांनी आंरराष्ट्रीय संबंध या विषयात एमफील केले आहे. तर त्याच विषयात त्यांनी पीएचडीही मिळवली आहे. त्या सध्या पुणे विद्यापीठात प्राध्यापिका आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंड यांनी पंडित यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, असं केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

 दरम्यान,जगदीश कुमार यांनी शांतिश्री पंडित यांच्या नियुक्तीबाबत अधिकृत माहिती दिली. ते म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पॉलिटिक्त आणि पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन विभागातील प्रा. शांतिश्री पंडित यांची जेएनयूच्या कुलगुरुपदी नियुक्ती झाल्याचा आनंद होत आहे. त्या विद्यापीठाच्या पहिला महिला कुलगुरू असतील. त्यांचे मी अभिनंतदन करतो. आज मी त्यांच्याकडे या पदाचा कार्यभार सोपवणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post