सतेज सुरज भोइर या आठ वर्षाच्या बाल गिर्यारोहकाने 1250 फूट उंचीचा डोंगरकडा लिंगाणा वर केली यशस्वी चढाई.

 सतेज या बाल गिर्यारोहकाचे पिंपरी चिंचवड शहरात सर्वत्र कौतुक होत आहे


प्रेस मीडिया ऑनलाईन

 पुणे जिल्हा प्रतिनिधी :अन्वरअली शेख :

पिंपरी चिंचवड; चिंचवड गावातील 8 वर्षाच्या सतेज सुरज भोईर या बाल गिर्यारोहकाने 1250 फूट उंचीची चढाई करत यशस्वीपणे लिंगाणा वर चडाई केली,तोरणा आणि रायगड किल्ल्याच्या मधोमध वसलेल्या लिंगाणा वर पहाटे पाच ला यशस्वीपणे चढाई करत चिंचवडकरांची मान अभिमानाने उंचावली आहे .

चिंचवड गाव केशव नगर भोईर आळी *साई कुंज* या ठिकाणी राहणारा सतेज सुरज भोइर, याला वयाच्या पाचव्या वर्षापासूनच डोंगर कड्यावर चढण्याची आवड होती, सतेज सुरज भोइर वाकड मधील इन्फट जिजस हाय स्कूल वाकड, या शाळेत  इयत्ता दुसरी  मधे शिकत आहे, सतेज ची मोठी बहीण साक्षी भोईर ही बास्केटबॉल  राज्यस्तरीय खेळाडू आहे, सतेज या बाल गिर्यारोहकाला  ट्रेकिंग ची प्रेरणा त्याच्या मोठ्या बहिणी  पासूनच मिळाली, सतेज 5 वर्षाचा असताना घोरावाडेश्वर या डोंगरावर सहजपणे सरसर चढत असे, आणि तेथूनच त्याला डोंगर-कडे सर करण्याची आवड निर्माण झाली, अशी माहिती सुरज भोइर यांनी प्रेस मीडिया लाईव्ह च्या पुणे जिल्हा प्रतिनिधी  यांना दिली.सुरज भोइर यांचा हॉटेल व्यवसाय आहे .

शिरूर येथील शिवदुर्ग प्रेमी ग्रुप जिल्हा परिषद शिक्षक वर्ग,गिर्यारोहक लहू उघडे, स्नेहल घरडे,एस एल.अडव्हेंचर टीम यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा,मुंबई, औरंगाबाद, नगर मधील 35 जणांनी सहभाग नोंदवला या वेळी या मोहिमेत  सर्वात जास्त  वय 67 वर्षाच्या राजाराम मराठे,  व  सर्वात लहान सतेज भोईर 8 वर्षाच्या या बाल गिर्यारोहकांने यशस्वीपणे चढाई केली.

 ही टीम रात्री 10 वाजता मोहरी या गावात पोहचले आणि रात्री 2 वाजता लिंगाणा चढाई ला सुरवात केली. पहाटे साडे पाच ला लिंगाणा वर पोहचल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली.


प्रेस मीडिया :

पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख


जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717

Post a Comment

Previous Post Next Post