निगडी येथील शक्ती भक्ती उड्डाणपुलाच्या खाली पडीकांचा अड्डा

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस स्थानकासमोर पसरले आहे घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य  

प्रेस मीडिया ऑनलाईन :

 पुणे जिल्हा प्रतिनिधी :अन्वरअली शेख : 



पिंपरी-चिंचवड निगडी येथील उड्डाणपुलाच्या खाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस स्थानकासमोर घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून पुलाच्या खाली पडिक लोकांची वस्ती जणू काय कोणी तरी वसवलेली आहे असं दृश्य निर्माण झालल आहे..? बस डेपो समोरील पुलाच्या खालून ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे , अनेक नागरिकांनी याबद्दल तोंडी तक्रारी दिल्या होत्या पण सर्व वाया गेले. या बाबत प्रेस मीडिया पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी पठाण एम एस यांनी स्वतः आढावा घेतला असता निगडी बस डेपो समोरील देहूरोडच्या दिशेने जाणाऱ्या पुलाच्या खाली पडिक लोकांनी आपली वस्ती वसवलेली दिसत आहे , दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी ते पुलाच्या खाली राहतात स्वयंपाक करतात आणि आंघोळ पांगुळ लघुशंका दुद्धत त्याच ठिकाणी करतात त्यामुळे तिथं  साचलेलं आहेत दुर्गंधी युक्त पाणी  त्यामुळे तेथेगटार गंगा  पसरली आहे  . या बाबत महानगरपालिकेच्या साफसफाई संबंधित विभागाने या ठिकाणी लक्ष घालावे अशी नागरिकांची जोरदार  मागणी होत आहे,



प्रेस मीडिया लाईव्ह : 

 पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :

Post a Comment

Previous Post Next Post