कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी ३१ कोटी ३१ लाखांचा निधी मंजूर


प्रेस मीडिया लाईव्ह.कॉम :

कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी ३१ कोटी ३१ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.श्री. ठाकरे दोन दिवसांसाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. येथील सयाजी हॉटेल येथे शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार ऋतुराज पाटील व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.


दरम्यान उद्या (ता. २१) "कोल्हापूर जिल्हा माझी वसुंधरा अभियान" याविषय कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यावरण व पर्यटन विकासा संदर्भात सकाळी साडेअकराला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली जाणार असल्याचे श्री.क्षिरसागर यांनी सांगितले. यावेळी, खासदार धैर्यशील माने, विजय देवणे उपस्थित होते. पालकमंत्री सतेज पाटील यांनीही श्री. ठाकरे यांचे स्वागत केले. सयाजी हॉटेलमधून श्रीय ठाकरे यांनी आमदार ऋतूराज पाटील यांच्या व माजी आमदार मालोजीराजे यांच्या निवासस्थानी भेट दिली.

मालोजीराजे भेटीने चर्चेला उधाण

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी माजी आमदार मालोजीराजे यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. अनेक वर्षापासून मालोजीराजे राजकारणापासून अल्पित आहेत. त्यांना पुन्हा या प्रवाहात सक्रीय करण्यासंदर्भात प्रयत्न असू शकतो का? अशी चर्चा सुरू होती.

जिल्हा परिषद, महापालिकेसाठी सज्ज राहा

जिल्ह्यात जिल्हा परिषद, महापालिकेची निवडणूक होवू घातली आहे. यात पूर्ण ताकदीने उतरण्याबाबतही चर्चा केली. खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह इतर शिवसैनिकांनी जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय होण्याच्या सूचनाही दिल्या. या वेळी श्री. क्षीरसागर व जिल्हाध्यक्ष देवणे यांच्या मुलांसोबतही चर्चा केली.

मराठा समाला आरक्षण मिळावे, यासाठी खासदार संभाजीराजे २६ फेब्रुवारीपासून मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. यातच, श्री ठाकरे यांनी आज मालोजीराजे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे, उपोषणाचा आणि भेटीचा संदर्भ घेऊन उपोषणाला बसू नये, यावर मार्ग काढता येईल, असे आवाहन करण्यासाठी श्री. ठाकरे यांनी केले का? असाही सवाल उपस्थित केलाजात आहे.


Post a Comment

Previous Post Next Post