सरकारचा निषेध म्हणून आंदोलकांनी काळ्या फिती लावून निषेध केला.
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी खा. संभाजीराजे काल पासून मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समाज बांधव कोल्हापुरात साखळी उपोषणास बसले आहेत.शनिवारी विविध समाज, पक्ष, संघटनांनी ऐतिहासिक दसरा चौकात येऊन उपोषणास पाठिंबा दिला. मराठा आरक्षणाला चाल ढकल करणार्या सरकारचा निषेध म्हणून आंदोलकांनी काळ्या फिती लावून निषेध केला.
सकाळी 11 वाजता आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साखळी उपोषणाला सुरुवात झाली. 'एक मराठा लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे', 'आम्ही संभाजीराजें सोबत' अशा घोषणांनी आंदोलकांनी दसरा चौक दणाणून सोडला. यानंतर शाहीर दिलीप सावंत यांनी 'हक्कासाठी लढतोय छत्रपती राजं…भगव्याची शपथ तुला लढायचं आज… तू लढायला शिक, मराठा मावळ्या… लढायला शिक' या विशेष कवणातून सरकारवर तोफ डागली. शाहीर रंगराव पाटील यांनीही शाहिरी कवणातून आरक्षणासाठी मराठा समाजाची होत असलेली फरफट मांडली.
दिवसभरात साबळेवाडी, बेले, निटवडे, हणमंतवाडी, खुपिरे, परिते, मरळी, कळे-खेरीवडे, पाडळी बुद्रुक, पडळ, निगवे दुमाला, भुयेवाडी, केर्ली, रजपूतवाडी, शिरोली दुमाला, मुडशिंगी या ग्रामपंचायतींनी पाठिंबा दिला. तसेच महाराष्ट्र राज्य मेकॅनिक असोसिएशन, अखिल भारतीय मराठा महासंघ, श्री जोतिबा परिसर हक्कदार पुजारी विश्वस्त समिती वाडीरत्नागिरी, श्री उत्तरेश्वर प्रासादिक तालीम मंडळ, सकल मराठा समाज हुपरी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, मुस्लिम बोर्डिंग, बहुजन परिवर्तन पार्टी, बहुजन विकास परिषद, मराठा सेवा संघ प्रणीत जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, आजी- माजी विद्यार्थी कृती समिती, मनसे विद्यार्थी सेना, संभाजीराजे फाऊंडेशन, शाहू मॅरेथॉन संयोजन समिती आदी संघटनांनी पाठिंबा दिला.
या साखळी उपोषणात गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट, अॅड. गुलाबराव घोरपडे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, बाबा महाडिक, बाबा इंदुलकर, हर्षल सुर्वे, इंद्रजित सावंत, उदय घोरपडे, प्रसन्न मोहिते, रूपेश पाटील, काका जाधव, बाळ घाटगे, कमलाकर जगदाडे, दिगंबर फराकटे, राजू जाधव, प्रसाद जाधव, कुलदीप गायकवाड, अनिल कदम, प्रकाश सरनाईक, अशोक पोवार, अनिल घाटगे, श्रीमती जयश्री जाधव, चंद्रकांत पाटील, संजय काटकर, दुर्गेश लिंग्रस, जयकुमार शिंदे, संदीप पाटील, मयूर भोसले, राजू लिंग्रस, किसन भोसले, किशोर घाटगे, अशोक देसाई, दिलीप देसाई, अतुल दिघे, उदय लाड, पै. विष्णू जोशीलकर, पै. दीनानाथ सिंह, संदीप देसाई, लालासाहेब गायकवाड, अभिजित डोंगळे, डॉ. प्रवीण कोडोलीकर, माणिक मंडलिक, बंटी सावंत सहभागी झाले होते. सायंकाळी आर.के.नगर येथील मराठा महासंघाचे कार्यकर्ते आंदोलन करून साखळी उपोषणात सहभागी झाले.