केवळ 5 रुपयात गोरगरिबांना येथे मिळते पोटभर जेवण.
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : माणुसकीची जपली नाती ,मदतीची ओढ़ वेगळी. अभिमानाने सांगतो आम्ही कोल्हापुरी जगात भारी कोल्हापूर म्हणजे दानशूर लोकांच शहर म्हणून ओळखलं जातं .याच शहरात गेल्या दोन वर्षा पासून आहे अखंड सेवा देऊन फक्त 5 रुपयात गोरगरिबांना आणि गरजू लोकासाठी कोल्हापूर थाळी नावाने हा उपक्रम चालू आहे.
लॉकडाउनच्या काळात गोरगरिबांना एक वेळच जेवण मिळत नव्हते .याच उद्देशाने कोल्हापूर थाळी हा उपक्रम सुरू केला आहे.या ठीकानी दररोज 250 ते 300लोक पोटभर जेऊन जातात . शाकाहारी जेवनात भात , चपाती ,आमटी बरोबर श्रीखंड आणि कोल्हापुरी व्हेज (रोज वेगवेगळी भाजी).तसेच आठवड्यातुन दोन वेळा मांसाहारिही जेवण दिले जाते.यात अडाकरी,मासे ,मटण आणि बटर चिकन चाही समावेश आहे. हा उपक्रम नानबान फौडेशन,अमेरिका यांच्या सहकार्याने श्री .रविन्द्र जाढ़्व संस्थापक उदय प्रभावळे,स्वपनील मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर थाळीची संपूर्ण टिम पार पाडत आहेत.या उपक्रमाला समाजातील दानशूर लोकांनी मदत करुन हा उपक्रम असाच अखंडपणे चालू रहावा अशी अपेक्षा जणमाणसातुन व्यक्त होत आहे.