लता मंगेशकर यांची कोडोलीत तत्कालीन फौजदार आर. आर.यांच्या घरी भेट



प्रेस मीडिया ऑनलाइन : 

मुरलीधर कांबळे :


लता दिदी पन्हाळा येथे मुक्कामी यायच्या  श्री जोतिबाच्या दर्शनाला आले वर सदर ठिकाणी कोडोलीचे तत्कालीन फौजदार आर.आर. पाटील बंदोबस्तास होते आर.आर. यांची देवभक्ती पाहून त्यानी त्याच्या कोडोली येथील रहात असलेल्या घरी भेट देण्याचे स्वत्ताच मान्य करीत लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ डिसेबर १९९३ रोजी सकाळीच त्या कोडोलीत आल्या लता दिदी येणार म्हणून अगदी फुलाचा गालीचा प्रवेश द्वारात केला होता त्या फुलाच्या गालीच्या वरून चालण्यास नम्र नकार देत लता दिदी जमिनीवरूनच चालत घरात आल्या त्याची ही नम्रता पाहून सर्वानाच गर्व वाटला सदर वेळी फौजदार आर.आर. पाटील यांच्या घरी त्याच्या आई, पत्नी सौ. कुंजलता मुले व नातेवाईक यांच्याशी सुमारे दीड तास संवाद साधला राज्याचे लोकप्रिय नेते आर.आर. पाटील यांचे बंधू फौजदार आर.आर. पाटील आहेत हे समजल्यावर या दोन बंधूच्या कर्तृत्वाचा त्यांना हेवा वाटला अखेर पर्यन्त आर.आर. पाटील यांना अधून मधून तसेच त्यांच्या वाढदिवसास  फोनवर शुभेच्छा लता दिदी देत होत्या.आर.आर.पाटील यांच्या मुळेच कोडोलीला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे येणे झाले.


.....................................

या भेटीचे साक्षीदार

सकाळचे तत्कालीन पत्रकार विश्वनाथ पाटील

पत्रकार दिलीप पाटील

तरूण भारत 

....................................

कोडोली ता. पन्हाळा येथे तत्कालीन फौजदार आर.आर. पाटील यांच्या घरी लता मंगेशकर यांच्या समवेत आई, पत्नी, मुले कोडोली ता. पन्हाळा येथे तत्कालीन फौजदार आर.आर. पाटील यांच्या घरी प्रवेश करताना फुलाच्या गालीच्या वरून  चालण्यास विनम्रपणे नकार देत त्या  बाजूने चालताना लता मंगेशकर

Post a Comment

Previous Post Next Post