शौर्य वीर मयूर शेळके यांना मिळाला शिवपुरस्कार
प्रेस मीडिया लाईव्ह.कॉम :
नरेश कोळंबे :
इतिहास संशोधक शिवश्री वसंत कोळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान चांधई येथे गेल्या १६ वर्षा पासून शिवजयंती साजरी कार्यांत येते . यावेळी फुले आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते प्रा . विजय कोंडिलकर सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवराय आज असते तर आजच्या समाजव्यवस्थेत त्यांनी कशा पद्धतीने राज्यकारभार केला असता व जनतेला न्याय दिला असता अन आपलं स्वराज्य कास चालवलं असत? ते सांगितलं .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश कोळंबे (डायरेक्टर एस . कांत फार्मा, वापी) यांनी, तर सूत्रसंचालन नंदकुमार कोळंबे यांनी केले. यावेळी जि. सदस्या सहाराताई कोळंबे , मा. अर्थ व बांधकाम सभापती उत्तम कोळंबे , नसरापूर ग्रामपंचायत सरपंच साक्षी मोहिते , पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते जयेंद्र कराळे, बिरसा क्रांती दल अध्यक्ष विनायक पारधी, नसरापूर ग्रामपंचायत माजी सरपंच राम कोळंबे, चांधई गावचे पोलीस पाटील सचिन कोळंबे , सामाजिक कार्यकर्ते संतोष ऐनकर, पत्रकार नरेश कोळंबे , पळस्पे ग्रामपंचायत मा. सरपंच मोहन गवंडी , ओबीसी महासंघाचे अध्यक्ष भगवान धुळे तर सामाजिक कार्यकर्ते भाई आकाश निर्मळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कोळंबे , शिवाजी कोळंबे , संतोष कोळंबे , देविदास कोळंबे यांनी विशेष मेहनत घेतली तर सचिन हि. कोळंबे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले .