डिकसळ शांतीनगर येथे त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर जयंती साजरी.



प्रेस मीडिया ऑनलाइन :

नरेश कोळंबे : कर्जत 

  त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची १२४ वी जयंती डिकसळ शांतीनगर येथे  रमाबाई महिला मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली.

    



  रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून माता रमाबाईंची मूर्तीची स्थापना  पुज्य भन्ते राहुल बोधी यांच्या हस्ते करण्यात आली व त्यांनी यावेळी  प्रवचन दिले. यावेळी  बुद्ध पुजा  उपासक प्रकाश गायकवाड, रमेश गायकवाड यांनी घेतली. महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली. भंतेजी यांचे स्वागत करण्यात आले .  महिला मंडळाच्या अध्यक्षा रेखाताई साळवी, ज्योत्स्ना गायकवाड , कल्पना हिरे , पुष्पलता गायकवाड , अंजना गायकवाड, गुलाब गायकवाड, सुजाता गायकवाड, संगीता गायकवाड, शोभा चव्हाण, स्वाती फाळे, प्रास्ताविक रेखा गायकवाड यांनी केले. उमरोली ग्रामपंचायत माजी सरपंच मोनिका साळोखे, उपसरपंच भारती पाटील, डिकसळ पोलीस पाटील सरिता शेळके, आशा वर्कर मीनाक्षी गायकर, वृषाली भोईर  यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला. सर्व पाहुण्यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.  भारतीय बौद्ध महासभेचे पी एस गायकवाड, मधुकर रोकडे,  हिराबाई हिरे, शारदाताई वाघमारे, काशिनाथ गायकवाड, शंकर हिरे , उल्हास जाधव, गुलाब शिंदे, सुभाष गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र यादव, तालुकाध्यक्ष धर्मेंद्र मोरे, सुनील गायकवाड, शांतीदूत मंडळाचे अध्यक्ष निखिल गायकवाड, नितीन गायकवाड, मधुकर गायकवाड, अशोक गायकवाड, रुपेश गायकवाड, मनोज गायकवाड, राजू चव्हाण, सचिन गायकवाड, अनंता भोईर , प्रशिक गायकवाड, तेजस हिरे, अजिंक्य हिरे, प्रफुल फाले, अँड उत्तम गायकवाड, रायगड भूषण किशोर गायकवाड आदी लोक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post