प्रेस मीडिया लाईव्ह :
कर्जत - नरेश कोळंबे :
कर्जत तालुक्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील राजकारणी आपापल्या परीने पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्नात असून विविध ठिकाणी जनतेत जाऊन आपली छाप त्यांवर पाडण्याचा प्रयत्न करत असतात. आज याच धर्तीवर उमरो ली ग्रामपंचायत विद्यमान सरपंच ठमाबाई नामदेव सांबरी व आषा नेणे वाडीतील शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत पिरकड यांनी सुरेश भाऊ लाड साहेब याच्या नेतुत्वावर विश्वास ठेऊन शुक्रवारी ज़िल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री सुधाकर शेठ घारे याच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये जाहीर प्रवेश केला.
ह्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी पक्षाला उमरोली विभागात नक्कीच नवी उमेद मिळून त्याचा चांगला फायदा येत्या निवडणुकांत पक्षाला होईल , असे बोलताना ज़िल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री सुधाकर शेठ घारे यांनी सांगितले.
उमरोली ग्रामपंचायतच्या शिवसेनेच्या विद्यमान थेट सरपंच ठमाबाई नामदेव सांबरी व आषाणे वाडीतील शिवसेनेचे शाखा प्रमुख श्री चंद्रकांत पिरकड यांनी पक्ष प्रवेश केलाच पण त्यांच्या सोबत नामदेव साबरी, रमेश साबरी, अलकाबाई साबरी, पदू साबरी, भाऊ होले, चंद्रकांत पिरकड, अर्जुन पिरकड, नरेश पिरकड, नरेश साबरी, धनाजी पिरकड, गणेश पिरकड, सुरेश पिरकड , विजय पिरकड, गोविंद पिरकड, राजेश पिरकड, अंकुश साबरी, विकास पिरकड या सहकाऱ्यानी सुध्दा जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भगवान शेठ चंचे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सागर शेळके, विरेंद्र जाधव, संदीप पाटील, निलेश बडेकर, तेजस भासे, भास्कर लोंगले, चेतन ठाणगे, महिंद्र ठोंबरे, काका ढाकवळ, श्याम पाटील, किशोर सावंत, सागर ठाणगे, सतिश ठाणगे, राजू पिरकड, नरेश ठोंबरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.