प्रेस मीडिया लाईव्ह :
नरेश कोळंबे : कर्जत
आदित्य दृष्टी सामाजिक विकास प्रतिष्ठान मार्फत ग्रुप ग्रामपंचायत नसरापूर कार्यालयात महिला बचतगट सक्षम आणि स्वावलंबी होण्यासाठी महिलांना मोफत मार्गदर्शन देण्यात आले.
कर्जत मधील ग्रामपंचायत नसरापूर येथे आदित्य दृष्टी सामाजिक विकास प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन अंशु अभिषेक, युवासेना कर्जत तालुका सचिव अॅड.संपत पांडुरंग हडप, यांच्या पुढाकाराने व प्रयत्नातून महिला बचतगटांसाठी मार्गदर्शन शिबीर ग्रामपंचायत कार्यालय चिंचवली - गणेगाव येथे संपन्न करण्यात आला होता.
या संस्थेचा मुख्य उद्देश सामाजिक व धार्मिक कार्य करणे हा असून बाळ आश्रमाचे बांधकाम यात विनामूल्य शिक्षण व वसतिगृहाची व्यवस्था, बेरोजगार, गरीब, असहाय्य महिलांना प्रशिक्षित करून लघुउद्योगाद्वारे रोजगार उपलब्ध करून देणे हा असून कर्जत तालुक्यातील विविध ग्रामपंचायत विभागात ते यासाठी प्रशिक्षण शिबीर घेत असून सर्व महिलांना आपल्या पायावर खंबीरपणे उभे करण्याचे महत्वपूर्ण काम सध्या या संस्थेच्या मार्फत सुरू आहे. सदरचा शिबीर संपन्न होत असतांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन अंशु अभिषेक, युवासेना कर्जत तालुका सचिव अॅड.संपत पांडुरंग हडप, सरपंच प्रमिला मोहिते, उपसरपंच दीपा कोळंबे, ट्रेनर सुवर्णा चव्हाण, महिला बचतगट सी.आर.पी. योगिता कोळंबे, कविता हिलम, ज्ञानगंगा ग्रामसंघाच्या हर्षदा थोरवे, ग्रामसंघाच्या सचिव सारिका कोळंबे, सविता तिखंडे, कोषाध्यक्ष नम्रता म्हात्रे, मनीषा देशमुख, जगदीश दगडे, प्रज्ञा वाघमारे, वृषाली शिंदे, त्याच बरोबर ग्रामपंचायत ऑपरेटर रोशनी कोळंबे, कर्मचारी मोतीराम कोळंबे, शरद तिखंडे आणि ग्रामपंचायत विभागतील सर्व महिला बचतगट च्या अध्यक्षा या प्रशिक्षणात उपस्थित होत्या.
सरदच्या शिबिरात महिलांच्या आवडीनुसार आणि त्यांना महत्वपूर्ण असणारे ट्रेनिंग ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात चिंचवली आणि चांधई येथे शुक्रवार दिनांक ११ मार्च पासून दिले जाणार आहे. त्यामुळे सर्व महिला बचतगटांना यामुळे प्रत्यक्षात फायदा होणार आहे. सर्व मान्यवर तसेच आलेल्या सर्वांचे स्वागत आणि आभार ग्रामपंचायत नसरापूर यांच्या वतीने मानण्यात आले.