प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा आणि स्वच्छ सर्वेक्षण अभियानअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.या अनुषंगाने आज गुरुवार दि.१७ फेब्रुवारी रोजी प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी शहरातील हॉटेल आणि मंगल कार्यालय व्यवसायिकांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीत माझी वसुंधरा आणि स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची सविस्तर माहिती व्यावसायिकांना देणेत आली. त्याच बरोबर हॉटेलमध्ये आणि मंगल कार्यालयात निर्माण होणारा ओला आणि सुका कचरा वेगवेगळा घंटागाडी मध्ये टाकण्याच्या सुचना देणेत आल्या. याकरिता नगरपरिषदेकडून स्वतंत्र घंटागाडी उपलब्ध करून देणेत येणार आहे. तसेच शहरातील ज्या होटेल व्यावसायिक तसेच मंगल कार्यालय व्यावसायिक यांनी रस्त्यावर किंवा इतरत्र कचरा टाकलेचे तसेच बेकायदेशीर प्लॅस्टिक वापरलेचे निदर्शनास आलेस त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातून जमा झालेल्या ओल्या कचऱ्यापासून नगरपरिषदे कडुन बायोमिथेन प्रकल्प सुरु करणेत येणार आहे. तरी आपले शहर स्वच्छ आणि सुंदर करणे साठी शहरातील सर्व हॉटेल आणि मंगल कार्यालय व्यावसायिकांनी नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी केले.
सदर बैठकी मध्येआरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, स्वच्छता निरिक्षक विजय पाटील यांचे सह शहरातील हॉटेल आणि मंगल कार्यालय प्रतिनिधी यांनी माझी वसुंधरा शपथ घेतली.