प्रेस मीडिया ऑनलाइन :
इचलकरंजी / प्रतिनिधी :
दिव्यांग असूनही केवळ जिद्दीच्या बळावर स्वावलंबी जीवन जगणाऱ्या बांधवांचा सत्कार व निराधार व्यक्तिंना मदतीचा हात देवून इचलकरंजी शहरातील स्वाभिमानी यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष विकास चौगुले यांनी आपला वाढदिवस साजरा केला.सामाजिक बांधिलकीचे भान जपत अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा झाल्याने या उपक्रमाचे नागरिकांतून मोठे कौतुक होत आहे.
इचलकरंजी शहरातील स्वाभिमानी यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष विकास चौगुले हे यंत्रमागधारकांचे प्रश्न सोडवण्या बरोबरच विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवण्यात कायमच अग्रेसर असतात.त्यांनी आपल्या वाढदिवसाला होणारा अनाठायी खर्च वाचवून त्याच खर्चातून सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वाढदिवसाचे औचित्य साधून इचलकरंजी शहरातील स्वतःच्या जिद्दीवर स्वावलंबी जीवन जगणाऱ्या दिव्यांग बांधवांचा स्वाभिमानी संघटनेचे नेते सौरभ शेट्टी यांच्या हस्ते भेटवस्तू व सन्मानपत्र देवून सत्कार केला.तसेच बेघर निवारा केंद्रातील व्यक्तींना बालाजी उद्योग समूहाचे प्रमुख धान्य व इतर गरजोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी विकास चौगुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबवण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करुन हा आदर्श सर्वांसाठी अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार काढले.यावेळी उपस्थित मान्यवर व मित्रमंडळींनी सामाजिक कार्यकर्ते विकास चौगुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, सामाजिक कार्यकर्ते राजू आलासे, नगरसेवक मनोज हिंगमिरे,नगरसेवक दिपक सुर्वे, स्वाभिमानी पक्षाचे शहराध्यक्ष रामदास कोळी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष बसगोंड बिरादार,ऋषिकेश गौड ,गोपाळ उरणे, दत्तात्रय देसाई , उद्योजक विकास खटावकर, पूर्वानंद सव्वाशे ,अभिजीत पटवा,उद्योजक प्रदीप चौगुले,राजू उरणे,सतीश पाटील,दिपक अथने, अण्णासाहेब शहापुरे, हेमंत वणकुंद्रे,अभिषेक पाटील,अनिस आत्तार,अरिहंत कुपवाडे,बाळासाहेब पाटील ,अविनाश कोरे, निवृत्ती शिरुगुरे, विद्याधर पाटील,संभाजी सूर्यवंशी, प्रमोद वंटे, सुनिल तोडकर,अमित पाटील,राजू कोन्नूर,शिवानंद रावळ, महावीर हुल्ले , धीरज होगाडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.