प्रेस मीडिया लाईव्ह :
ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा व इचलकरंजी शहर शाखे तर्फे चित्रकला ऑनलाईन इंटर मिजीएट परिक्षा फि रद्द करणे बाबत जिल्हाधिकारी व महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय कार्यालय कोल्हापूर , तसेच ऑनलाईन पत्राद्वारे मा.मुख्यमंत्री, शिक्षण मंत्रीव उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना निवेदन देणेत आले.....!
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र प्रविष्ट होणार्या विद्यार्थ्या करीता शिक्षण विभागाने इंटर मिजीएट ड्रॉईंग ग्रेड परिक्षा २२ व २३ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे आदेशीत केले आहे. परंतू ऑनलाईन परिक्षेत परीक्षक, पर्यवेक्षक आदी बाबींचा खर्च केला जात नाही. तसेच ऑफलाईन परिक्षा घेतली असता १०० रू.फि घेतली जात असे. मग ऑनलाईन परिक्षा फि दुप्पट म्हणजे २०० रू का आकारली जात आहे ? तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला अँड्रॉईड मोबाईल उपलब्ध होतोच असे नाही. परीक्षेसाठी पाच तास मोबाईल वापरणे धोकादायक ठरू शकते. आशा अनेक अडचणी निर्माण होतील. सध्या कोरोनामुळे पालकांची अर्थीक परीस्थीतीही चांगली नाही. तसेच यापूर्वी इंटर मिजीएट ग्रेड परिक्षा घेतली आहे त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना ग्रेड द्यावी व विद्यार्थ्यावरिल अन्याय कारक फि रद्द करण्यात यावी. अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास निवासी उप जिल्हाधिकारी मां.शंकरराव जाधव साहेब यांना व महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय कार्यालय कोल्हापूर यांना देणेत आले....!
यावेळी जिल्हा अध्यक्ष बी. जे. पाटील, पूणे विभागीय सदस्य सुशांत पाटील, संघटक सुरेश माने, सचिव दादासो शेलार, इचलकरंजी अध्यक्ष सुरेंद्र दास, सुकूमार नरंदेकर, महानगर अध्यक्ष अशोक पोतनीस, प्रदेश प्रवासी महासंघाचे उपाध्यक्ष सतिश फनसे व कोषाध्यक्ष यशवंतराव शेळके , इचलकरंजी शाखेचे पदाधिकारीइत्यादी उपस्थितीत होते.