प्रेस मीडिया ऑनलाइन :
इचलकरंजी ता. ११ समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस कालवश आचार्य शांताराम गरुड यांच्या ९५ व्या जन्मदिनानिमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. " केंद्रीय अर्थसंकल्प : २०२२- २३ " या विषयावर ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. डॉ. जे.एफ. पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच यावेळी " प्रबोधन प्रकाशन ज्योती "मासिकाच्या फेब्रुवारीच्या अंकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. अशोक चौसाळकर भूषवणार आहेत.
समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात मंगळवार ता. १५ फेब्रुवारी २२ रोजी सायं.६ वाजता हे व्याख्यान होणार आहे. तरी या व्याख्यानाला जिज्ञासू नागरिक बंधू - भगिनींनी यावे असे आवाहन समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले आहे.