इचलकरंजी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक ठिकाणी बंद आणि बेवारस स्थितीत लावणेत आलेली वाहने

  नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून  द्यावीत :-प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल


प्रेस मीडिया लाईव्ह :

  इचलकरंजी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावर बंद आणि बेवारस स्थितीत अनेक वाहने लावणेत आलेली होती. याबाबत शहरातील विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या वतीने तक्रारी होत होत्या. सदर तक्रारीस अनुसरून प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी वृत्तपत्राद्वारे शहरातील नागरिकांना (ज्यांच्या मालकीची वाहने असलेल्यांना) अशी वाहने ३१ जानेवारी पर्यंत उचलनेचे आवाहन केले होते. सदर मुदतीनंतर दि.२ फेब्रुवारी पासुन मुख्य अधिकारी डॉ. ठेंगल यांच्या मार्गदर्शना खाली शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या सहकार्याने आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांच्या नेतृत्वा खाली शहरातील सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावर बेवारस आणि बंद स्थितीत लावलेली वाहने उचलनेची मोहीम राबविण्यात आली होती. 

या मोहिमेत शहरातील विविध ठिकाणची वाहने उचलुन जप्त करण्यात आली. जप्त करणेत आलेली वाहने २८ फेब्रुवारी पर्यंत मुळ मालकांना कागदपत्रे सादर केलेनंतर दंड भरून परत देणेत येणार असुन २८ फेब्रुवारी नंतर उर्वरित सर्व वाहनांची लिलावाद्वारे विक्री करणेत येणार आहे.तरी अद्यापही आपल्या आजुबाजूच्या परिसरात अशी वाहने लावलेली आढळून आल्यास शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार (९१५८००५१५१) अथवा अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे (८५५४९८४५५३) यांचेशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी केले आहे.


  

Post a Comment

Previous Post Next Post