प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी शहरातील भीषण पाणीटंचाई प्रश्नासंदर्भात ताराराणी पक्षाच्यावतीने उपमुख्याधिकारी केतन गुजर, जलअभियंता सुभाष देशपांडे यांना इचलकरंजी नगरपरिषद येथे निवेदन देण्यात आले.
इचलकरंजी तील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. त्यासाठी प्रशासनाने कृष्णा योजना सुरळीत करण्यास कट्टीमोळा डोह योजना सुरू करावी. त्याचबरोबर 100 शुद्ध पेयजल प्रकल्पांची तातडीने उभारणी करून पाणीप्रश्न तातडीने मार्गी लागून शहरवासीयांना मुबलक पाणी द्यावे असे निवेदन देण्यात आले. यासह इचलकरंजी वासियांना एक दिवस आड पाणी मिळावे, अशी मागणी ताराराणी पक्षाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी ताराराणी पक्षाध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, महादेव कांबळे चंद्रकांत इंगवले, महावीर कुरुंदवाडे, रंगा लाखे, चंद्रशेखर शहा, दीपक सूर्वे, संजय केंगार, राजू बोंद्रे, इम्रान मकानदार, नरसिंह पारिख, नितेश पोवार, राहुल घाट, कपिल शेटके, प्रशांत कांबळे, सुहास कांबळे, सतीश मुळीक, विजय पाटील, अनिल शिकलगार, फरीद मुजावर, विजय पोवळे, शांताराम लाखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.