बारामती तालुक्यातील वानेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मळशी गावाला बसले हदरे.

नागरिकांच्या घरांचे' दगड खाणीतील  स्फोटामुळे  मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. 

प्रेस मीडिया ऑनलाइन :

बारामती :-तालुक्यातील सोमेश्वर नगर,वाणेवाडी मळशी गावातील नागरिकांच्या घरांचे' दगड खाणीतील  स्फोटामुळे  मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सदर खडी क्रेशर हे वाघळवाडी ग्रामपंचायत हद्दीत असल्याने खडी क्रेशर मुळे येथील' दगड खाणीतील दगड काढण्यासाठी जिलेटीन स्फोटाचा वापर हा नियमापेक्षा ज्यास्त प्रमाणात केला जात असल्याने घरांना तडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात विविध गावांमध्ये रस्ता कामासाठी दगड व खडीची आवश्यकता भासते  त्यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातील खडी क्रेशर कंपनी कडून खडी घेतली जाते.वाघळवाडी लगत मळशी हे गाव आकदी जवळपास असल्याने गावातील शेती शिवारातील विहीरीचे पाणी पातळी खालावली आहे तसेच घरांना तडे देखील गेले आहेत.


 मळशी गाव लगत   दगड खाण व खडी क्रेशर प्रकल्प उभारण्यात आला असल्याने या खाणीत बोर ब्लास्टिंगच्या साह्याने मोठ-मोठे स्फोट केले जात असून या स्फोटामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत हादरे बसून मोठे नुकसान होत आहे परंतु संबंधित क्रेशर मालकाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी स्थानिक नागरिक घाबरत असल्याने त्यांचा गैरफायदा संबंधित क्रेशर मालक घेत असल्याचे दिसून येते आहे.

 सदर दगड खाण क्रेशर तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यासाठी  स्थानिक नागरिकांनी मानव अधिकार फाउंडेशन पच्छिम महाराष्ट्र मिडिया संरक्षण उपाध्यक्ष यांच्याकडे मदतीची मागणी केली असून  तक्रारी निवेदनाद्वारे  सुद्धा मागणी केली आहे.

स्थानिक नागरिकांनी निवेदनात म्हटले आहे की मळशी गावा शेजारच्या , वाघळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर २३१  मध्ये स्थानिक गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने दगड खाण व खडी क्रेशरचा प्रकल्प उभा केला आहे.संबधीत खानी मध्ये नियमा बाहेर जाऊन उत्खनन करताना मोठमोठे स्फोट केले जाता आहेत त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या घरांना मोठ्या प्रमाणावर हादरे बसत असून आमच्या घरांच्या भिंतींना तडे जात आहेत. तसेच स्फोटा दरम्यान बाहेर पडणारा विषारी वायू ,धूर, दगड व खडी क्रेशरमधून बाहेर पडणारी धूळ यामुळे आमच्या स्थानिक नागरिकांचे आरोग्य व शेतपीक धोक्यात आले आहे. खाणीतील स्फोटादरम्यान मोठमोठे दगड उडून रहिवाशी वस्तीनजीक येऊन पडत असल्याने त्यातून आम्हा स्थानिक रहिवाशांना गंभीर इजा तसेच जीवीतहानी देखील होऊ शकते. खाणीतील विषारी वायू व धुळीमुळे  स्थानिकांना गंभीर श्वसनाचे विकार जडू देखील शकतात. तसेच त्यांच्या शेती व्यवसायावर विपरीत परिणाम देखील मोठ्या प्रमाणावर झाला असल्याने आम्हा गोर गरीब शेतकरी वर्गाला सदरच्या दगड खाणीतील बेकायदेशिर उत्खननामुळे मोठे संकट उभे टाकले आहे सदर घटनेची वेळीच दखल घेऊन कारवाई न झाल्यास दगड खाणीतून निर्माण होणार्‍या विषारी वायू , धूळ, व धूर यामुळे भविष्यात*स्थानिक पातळीवर *जीवीतहानी देखील होऊ शकते यात मात्र तिळमात्र शंका नाही. 

आमची शेती देखील हळूहळू नष्ट होऊ शकते, तरी सदर दगड खाण व खडी क्रेशर मालकाने तात्काळ योग्य ती पर्याय वेवस्था करण्याबाबत निर्णय घ्यावा तसेच वाघळवाडी व वाणेवाडी गावातील तलाठी यांनी तत्काळ योग्य ती कारवाई करावी करून होत असलेल्या बोर ब्लास्टिंग चे काम तत्काळ बंद करावे अशी मागणी मळशी येथील स्थानिक ग्रामस्थांचा मधुन होत आहे.


धनराज जगताप:- मो.9145709938

Post a Comment

Previous Post Next Post