मनपा मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले.
मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर हे राजापेठ अंडर बायपासची पाहणी करत असताना रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक केल्यामुळे, आता मनपा मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत काम बंद आंदोलन सुरू करत घोषणाबाजी सुरू केली आहे.
अमरावती : अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर आमदार रवी राणा यांनी अनधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवल्याने तो पुतळा मनपा प्रशासनाने हटवला होता. तर, १९ फेब्रुवारीपूर्वी शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवा अशी मागणी आमदार रवी राणा यांची आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आल्याने संतप्त झालेल्या रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकरयांच्या अंगावर शाईफेकून आपला निषेध नोंदवला आहे.
दरम्यान आज मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर हे राजापेठ अंडर बायपासची पाहणी करत असताना रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक केल्यामुळे, आता मनपा मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत काम बंद आंदोलन सुरू करत घोषणाबाजी सुरू केली आहे. दरम्यान, आता आयुक्तांच्या समर्थनार्थ कर्मचारी आक्रमक झाले त्यांनी शाईफेकचा निषेध नोंदवला असून शाई केक करणाऱ्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तर, शाई फेक करणाऱ्या दोघ्या महिलांना अटक केल्याची माहिती आहे.