राष्ट्रवादीच्या अक्षय मोरे यांचा आटपाडीत सत्कार

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

आटपाडी दि .१९ (प्रतिनिधी ) :   राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या आटपाडी तालुका अध्यक्ष पदी शेटफळे येथील विद्यार्थी नेते अक्षय मोरे यांची निवड झाल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला 

 अक्षय मोरे यांनी सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन आपल्या निवडी बरोबर नवीन कार्यकारणी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, समस्या, पक्षाची ध्येय धोरणे याबाबत सविस्तर चर्चा केली . आणि भविष्यात आपणास मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा अक्षय मोरे यांनी यावेळी व्यक्त केली .

 राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रवादी साठी आटपाडी तालुक्यात सक्रीय होणारा विद्यार्थी - विद्यार्थीनींचा शेकडोंचा लढवय्या ग्रुप आपण तयार करावा . सांगली जिल्ह्यात, आटपाडी तालुक्याची विद्यार्थी काँग्रेस सर्वात मोठी, कर्तृत्व संपन्न आणि लढवय्यांची म्हणून ओळखली गेली पाहीजे . राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना . जयंतराव पाटील साहेबांच्या सर्वस्पर्शी, सर्वमान्य, सर्वप्रिय आणि सर्वोत्तम नेतृत्वाखालच्या जिल्ह्यातील आपण सर्वजण आहोत . याचा सार्थ अभिमान आपणा सर्वांना असला पाहीजे . राष्ट्रवादीच्या आटपाडी तालुका विद्यार्थी युनिट च्या चांगल्या कार्याची जयंतराव साहेबांनी खास दखल घ्यावी आणि तुम्हांस गौरवावे इतके उत्तुंग, लक्षवेधी, सर्वसमावेशक काम राष्ट्रवादीच्या सर्वांशीच मिळून मिसळून करा, असा सल्ला सादिक खाटीक यांनी अक्षय मोरे यांना दिला . 

 यावेळी सोने -चांदीचे व्यापारी संतोषबापू जवळे, राष्ट्रवादीचे युवा नेते कुर्बानहुसेन खाटीक, राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका कार्यकारणी सदस्य अभिजीत जवळे हे उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post