पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाणे ग्रामीण काँग्रेसची जोरदार निदर्शने




प्रेस मीडिया ऑनलाईन

सुनील पाटील :

 संसदभवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या व्यक्तव्याच्या निषेधार्थ आज भिवंडी ठाणे ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद‌ चोरघे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई - नाशिक महामार्गालगत ठिकठिकाणी घोषणाबाजी करुन नरेंद्र मोदी माफी मागो आंदोलन करण्यात आले

.दुस-यावर बोट दाखवण्यापेक्षा स्वताची तीन बोटे हे आपल्याकडे असतात हे त्यांनी विसरु नये.केंद्र सरकारने जर योग्य वेळी योग्य निर्णय घेतले असते तर आज कोरोना संसर्ग परिस्थिती नियंत्रणात असती.   कोरोनाने सर्वाधिक मृत्यू उत्तरप्रेशात झाले असुन त्या ठिकाणी भाजपचे सरकार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदीनी केलेले व्यक्तव्य चुकीचे असुन त्याबबत लवकरात लवकर माफी मांगावी अन्यथा हे आंदोलन अजुन तीव्र होईल अशा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post