पुणेकरांनो सावधान मास्क परिधान केला नसेल तर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेलं
प्रेस मीडिया ऑनलाईन :
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :
पुणे पोलिसांचा विना मास्क लावून वावरणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे,कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रशासनाने निर्बंध अधिक कडक केले आहेत. पुणे पोलिसांच्या विनामास्क कारवाईला वेग आला आहे. पुणे पोलिसांनी मागील दहा दिवसांत विनामास्क कारवाईत तब्बल ३३ लाख रुपये दंड वसूल केला आहे.
पुणे पोलिसांनी ७ ते १४ जानेवारी या कालावधीत ७ हजार ७७५ विनामास्क वावरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत एकूण ३३ लाख २ हजार दंड वसूल केला आहे. कोरोनाच्या मागील दोन लाटेत पुणे पोलिसांनी ५.४२ लाख नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत २६.५२ कोटी रुपये एवढा दंड वसूल केला आहे.
दरम्यान, वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दिवसाची जमावबंदी आणि रात्रीचा नाईट कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विनामास्क वावरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.