रायगड जिल्ह्याचे प्रशासन मदत करीत नसल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप

 कर्जत तहसील कार्यालय बाहेर जमिनीवर बसून आंदोलन..

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा  प्रतिनिधी  : सुनील पाटील : 

कर्जत तालुक्यातील हिंदू देवस्थान जमीन आणि अलिबाग येथील वन जमिनीवरील बंगल्या प्रकरणी रायगड जिल्ह्याचे प्रशासन कोणत्याही परकराची मदत करीत नसल्याचा आरोप भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. दरम्यान,गेली सव्वा वर्षे पाठपुरावा करून देखील ठोस माहिती मिळत नसल्याने किरीट सोमयाय यांनी जमिनीवर बसून राज्य सरकार विरुद्ध घोषणाबाजी केली. 

 

आज २८ जानेवारी रोजी दुपारी भाजप नेते किरीट सोमय्या हे कर्जत येथे आले आणि तहसीलदार यांची भेट घेऊन वैजनाथ येथील हिंदू देवस्थान जमिनीबाबत माहिती मागितली.तहसीलदार यांच्या कार्यलयातून बाहेर आलेले सोमय्या यांनी तेथील एका रिकाम्या शेड मध्ये जमिनीवर बसून बैठे आंदोलन सुरु केले.त्यावेळी किरीट सोमय्या यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर,भाजप जिल्हा उपाध्यक्ष रमेश मुंढे,भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सुनील गोगटे,महिला मोर्चा तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी करीत सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकार आणि ठाकरे कुटुंबावर टीका केली.सोमय्या यांनी यावेळी हिंदू देवस्थानची जमीन मुल्सिम व्यक्तीच्या नावावर झाली कशी?असा प्रश्न उपस्थित केला.हिंदू देवस्थानची जमीन मुल्सिम धर्माच्या व्यक्तीवर झालीच कशी? मात्र तीच जमीन चार महिन्यांनी श्रीधर पाटणकर या व्यक्तीच्या नावावर झाली आहे अशी माहिती देत हे पाटणकर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ आहेत यांची देखील आठवण करून दिली. 

    त्याच वेळी किरीट सोमय्या यांनी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाचा अलिबाग येथील जमीन आणि कर्जत येथील वैजनाथ येथील ठाकरे कुटुंबाकडून शपथपत्रात माहिती दिलेली असल्याने त्याबाबत दाद मागत आहे. मात्र जिल्हा प्रशासन मागील सव्वा वर्षे केवळ टोलवाटोलवी करीत आहे असा आरोप केला. कर्जत तहसील कार्यलयातून किरीट सोमया हे कर्जत- कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या डी मार्ट येथे पोहचले आणि तेथे मागील आठवड्याप्रमाणे तेथील रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानाच्या जमिनीची पाहणी केली.दरम्यान,किरीट सोमय्या यांच्या नव्या पवित्र्यामुळे राज्यातील महाविकस आघाडीच्या सरकार साठी इशारा देण्याचा प्रकार यातून दिसून येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post