मुदत वाढवून देण्याची लोकजनशक्ती पार्टीची ( रामविलास ) ने केली आहे.
जीलानी (मुन्ना ) शेख :
प्रेस मीडिया :
पुणे : वेश्या व्यवसायातील महिलांना शिधापत्रिका काढण्यासाठी दिलेली ३ दिवसांची मुदत वाढवून देण्याची मागणी लोकजनशक्ती पार्टी ( रामविलास ) ने केली आहे. लोकजनशक्ती पार्टी चे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात हे निवेदन दिल
.अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलांना, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना शिधापत्रिका काढण्यासाठी १७ जानेवारी ते १९ जानेवारी अशी मुदत देण्यात आलेली आहे, ती वाढवून ६ महिने करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या वेळी संजय आल्हाट, अमर पुणेकर, के सी पवार, कन्हैय्या पाटोळे, कल्पना जगताप, राहुल कुलकर्णी , बंडू वाघमारे, सचिन अहिरे उपस्थित होते.