कोल्हापूर महापालिकेस २३७ कोटी ४७ लाखांच्या निधीला तांत्रिक मंजुरी मिळाली

या निधीतून रस्ते, गर्टस, भुयारी मार्ग व फुटपाथ अशी कामे होणार 


प्रेस मीडिया ऑनलाइन : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तरीय) याअंर्तगत कोल्हापूर महापालिकेस २३७ कोटी ४७ लाखांच्या निधीला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे.तीन टप्प्यात हा निधी मिळणार आहे. या निधीतून रस्ते, गर्टस, भुयारी मार्ग व फुटपाथ अशी कामे होणार आहेत. यात शहरातील प्रमुख ८२ रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण अशी कामे प्राधान्याने होणार आहेत, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

क्षीरसागर म्हणाले, ''नगरोत्थान (राज्यस्तर) योजेनअंर्तगत शहरात मुलभूत कामे होणार आहेत. त्यासाठी १८९ कोटी ५५ लाखांचा प्रस्ताव २०१७ ला सादर केला होता. हा प्रस्ताव प्रलंबित होता. या प्रस्तावात काही सुधारणा करून नव्याने शासनाकडे पाठवला होता. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार मंत्रालयीन स्तरावर बैठक घेऊन नव्याने सादर केलेल्या प्रस्तावानुसार २०३ कोटींच्या प्रस्तावास मान्यता दिली.'' ते पुढे म्हणाले, '' अतिवृष्टी काळात शहरातील ३५ प्रभागांत महापुराचे पाणी होते. त्यामुळे पूरग्रस्त भागातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली. त्या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे नागरिकांनाही प्रचंड त्रास होत आहे.

अनेक रस्ते खराब झाले. अशा ८२ रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण, गटर्स, ड्रेनेज फुटपाथ सुविधा करण्यात येणार आहे. महापालिकेचे उत्पन्न मर्यादीत आहे.महापालिकेचे उत्पन्न मर्यादीत आहे. त्यामुळे सुविधा निर्माण करण्यात अडथळा येत होता.रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर पडेल असे सुशोभीकरण होईल. पर्यटनपूरक अशी कामे होतील. जवळपास १५ कोटींचा डीपीआर मंजूर झाला आहे.''

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ करणे ही नैसर्गिक गरज आहे. पुण्याची हद्दवाढ झाली. त्यापाठोपाठ कोल्हापूर शहराचीही हद्दवाढ व्हावी, या मागणीसाठी आंदोलन केले होते. यापुढील काळातही हद्दवाढीसाठी आपण आग्रही राहणार आहोत. मात्र सर्वांना विश्वासात घेऊनच हद्दवाढ व्हावी. कोणाचाही विरोध राहणार नाही याची काळजीही घ्यावी लागेल असे मतही क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post