प्रशासन व लोकप्रतिनिधीच जर दुर्लक्ष करू लागले तर जनतेच्या समस्या सोडविणार कोण ...?
येथील लोकप्रतिनिधी म्हणजे असून बोंब नसून खोळंबा..
प्रेस मीडिया ऑनलाईन
रायगड जिल्हा प्रतिनिधी : सुनील पाटील .
आपटा फाटा ते रसायनी हा रस्ता मुंबई - गोवा महामार्गाला जोडणारा अंतर्गत रस्ता आहे . गेली कित्येक वर्षे पाठपुरावा करून सुद्धा रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही .
मोठं - मोठे खड्डे असल्या कारणाने दुचाकी वाहकांचे संतुलन जाऊन अपघात होत आहेत . मागील 15 दिवसांत चार अपघात घडले .त्या मधील आपटा गावातील ग्रामस्थ विलास कदम यांच्या हाटाला दुखापत होऊन फ्रॅक्चर झाला . मुख्य रस्त्यावर फ़रशी आहेत , आपटा फाटा एच.सी.सी कंपनी चौकच्या पुढे वळणदार रस्ता आहे . तिथे फरशी खालील भराव खचल्याने मोठा खड्डा पडला आहे , नवीन प्रवाशांसाठी हा खड्डा म्हणजे मृत्युच द्वारच आहे . त्याच प्रमाणें आपटा गावातील रेल्वे ब्रिज जवळ अश्याच प्रकारची समस्या पाहायला मिळते. आजूबाजूला घनदाट जंगल असल्याने झाडे - झुडुपांच प्रमाण जास्त आहे . ही झाडे रस्त्यावर पडत असतात. त्याची कापनी होत नसल्याने सुद्धा अपघातास आमंत्रण दिले जाते . सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी टिळे साहेब यांना विचारले असता , उडवा- उडवीची उत्तरे देतात . आज तागायत हीच परिस्थिती पाहायला मिळत असल्याने सदर परिसरातील नोकरवर्ग , वाहनचालक , ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
भविष्यात जर ह्या खड्ड्या मुळे अपघातात मृत्युमुखी झाले तर सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल का असा प्रश्न आपटा गावातील शिवसैनिक स्वप्नील भोवड यांनी उपस्थित केला आहे . स्थानिक आमदारांचे लक्ष नाही त्याच प्रमाणे कंत्राटदार जे काम करतो ते नित्कृष्ट दर्जाचं असल्या कारणानें विभागातिल ग्रामस्थांचा संताप अनावर होऊ लागला आहे. .
प्रशासन व लोकप्रतिनिधीच जर दुर्लक्ष करू लागले तर जनतेच्या समस्या सोडविणार कोण ...? असा प्रश्न सामान्य जनतेला पडलाय .