अशी ग्वाही माजी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी दिली.
प्रेस मीडिया ऑनलाइन :
इचलकरंजी - इचलकरंजी येथे महात्मा बसवेश्वर मल्टिपर्पज हॉल व उद्यानाचे काम गतीने पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्नशील राहणार असून ही वास्तू शहराच्या वैभवात भर घालणारी ठरेल, अशी ग्वाही माजी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी दिली.
सांगली नाका परिसरातील नगरपरिषद मालकीच्या रि.स.नं. 633 अ सिसन 18060 मधील ओपन स्पेसमध्ये मल्टिपर्पज हॉल व बसवेश्वर उद्यान विकसित करण्यास नगरोत्थानमधून जिल्हाधिकार्यांकडून मान्यता मिळाली आहे. या कामी माजी जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील व माजी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्या अनुषंगाने वीरशैव उत्कर्ष मंडळ व इचलकरंजी शहर व परिसरातील लिंगायत समाजबांधवांच्या वतीने सौ. अलका स्वामी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. इचलकरंजी शहरात लिंगायत समाजाचे आराध्य दैवत जगद्गुरु महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी होत असल्याने त्यासाठी गतीने पाठपुरावा सुरु असल्याचेही सौ. स्वामी यांनी सांगितले.
याप्रसंगी वीरशैव उत्कर्ष मंडळ सिव्हिक बोर्ड सदस्य बसवेश्वर डोईजड, अध्यक्ष गजानन सुलतानपुरे, निशिकांत महाजन, प्रकाश दत्तवाडे, एस. टी. खोत, सुभाष तोडकर,बाबासो राजमाने, चंद्रकांत चौगुले, उमेश पाटील, शंकर बिल्लुर, नागेश पाटील, नंदकुमार मळोद, सुनिल चिंगळे, सुभाष मलाबादे, अनिल चचडी आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
त्याचबरोबर सांगली रोड व यड्राव येथील लिंगायत समाजाच्यावतीने सौ. स्वामी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रधान माळी, राजू कोरे, प्रदीप दरीबे, बालमोहन कित्तुरे, अमोल कित्तुरे, ग्रामपंचायत सदस्य महेश कुंभार, बाबासो राजमाने, प्रदीप हिंगे, सचिन येलाज, घन:श्याम कुंभार, प्रसन्ना परीट, राजू पाटील, उदय कुंभार, दरगोंडा पाटील आदी उपस्थित होते.