स्व. माजी खास. दत्ताजीराव कदम आण्णा यांच्या जयंती निमित्त श्री दत्त साखर शिरोळच्या वतीने विनम्र अभिवादन



प्रेस मीडिया :

शिरोळ /प्रतिनिधी:

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन, माजी खासदार स्व. दत्ताजीराव कदम आण्णा यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली.

 या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व. दत्ताजीराव कदम यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याप्रमाणे स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासही संचालक शरदचंद्र फाटक यांनी, स्व. दिनकरराव यादव यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक शेखर पाटील यांनी व स्व. विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक निजामसो गौस पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करून अभिवादन केले. 

या प्रसंगी कारखान्याचे संचालक अनिलकुमार यादव, इंद्रजीत पाटील, रघुनाथ पाटील, अॅड. प्रमोद पाटील, बाबासो पाटील, अरूणकुमार देसाई, विश्वनाथ माने, बसगोंडा पाटील, अमर यादव, संचालिका विनया घोरपडे, यशोदा कोळी, संगिता पाटील-कोथळीकर, रणजीत कदम, महेंद्र बागे, विजय सुर्यवंशी, प्रदिप बनगे, मलकारी तेरदाळे, बाळासाहेब पाटील हलसवडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. तसेच माजी सरपंच सुरेश पाटील (आगर) उत्तमराव पाटील, पी. जी. पाटील, अशोकराव निर्मळे, कुपवाडे पैलवान, धनाजी पाटील नरदेकर, शिरोळचे नगरसेवक तातोबा पाटील या सोबतच महाराष्ट्र व कर्नाटकातील सभासद कार्यकर्ते तसेच कामगार युनियन, कामगार सोसायटी, पॉलिटेकनिक कॉलेज, आयटीआय व दत्त भांडारचे सर्व संचालक, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post