पत्रकार बाळासाहेब माळी व दगडू माने यांचा सत्कार

 


प्रेस मीडिया ऑनलाइन :

शिरोळ /प्रतिनिधी:

  शिरोळ तालुक्यातील जनसामान्यांचे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारांनी जातीने लक्ष घालून लोकप्रतिनिधी व प्रशासनाचेही लक्ष वेधून खास प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.


शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब माळी यांची तर कै.   श्रीपती माने कृष्णामाई पाणीपुरवठा संस्थेच्या अध्यक्षपदी दगडू माने यांची निवड झाल्याबद्दल श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

  यावेळी कारखान्याचे संचालक दरगु गावडे, कोल्हापूर जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, माजी सरपंच गजानन संकपाळ,  नगरपरिषदेचे नगरसेवक पंडित काळे, तातोबा पाटील, माजी सरपंच संजय अनुसे, सुनील इनामदार, संजय सुतार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post