सांगली जिल्ह्यातील 3 नगरपंचायतीच्या प्रत्येकी 4 प्रभाग आणि सांगली महापालिकेच्या एका प्रभागाच्या पोट निवडणुकीसाठी आज मतदान

 तीन नगरपंचायतीच्या 12 जागांसाठी 41 उमेदवार तर महापालिकेच्या एका पोट निवडणूकींत 6 उमेदवार रिंगणात..


प्रेस मीडिया :

सांगली जिल्ह्यातील 3 नगरपंचायतीच्या प्रत्येकी 4 प्रभाग आणि सांगली महापालिकेच्या एका प्रभागाच्या पोट निवडणुकीसाठी आज 18 जानेवारी रोजी मतदान पार पडत आहे.तीन नगरपंचायतीच्या 12 जागांसाठी 41 उमेदवार तर महापालिकेच्या एका पोट निवडणूकींत 6 उमेदवार रिंगणात आहेत.

सांगली जिल्ह्यातील 3 नगरपंचायतीच्या प्रत्येकी 4 प्रभाग आणि सांगली महापालिकेच्या एका प्रभागाच्या पोट निवडणुकीसाठी आज 18 जानेवारी रोजी मतदान पार पडत आहे. तीन नगरपंचायतीच्या 12 जागांसाठी 41 उमेदवार तर महापालिकेच्या एका पोट निवडणूकींत 6 उमेदवार रिंगणात आहेत.नगरपंचायतिच्या 12 जागांसाठी 8 हजार 28 मतदार तर महापालिकेच्या 1 जागेसाठी 24 हजार 390 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

कवठे म्हणकाळ, कडेगाव आणि खानापूर असे तीन नगरपंचायतीसाठी प्रत्येकी चार प्रभाग असे बारा मतदान केंद्र आणि सांगली महापालिकेच्या प्रभाग 16 साठी 34 मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेले आहेत. जिल्हा पोलिसांच्या वतीने मतदान केंद्र परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर महापालिका आणि निवडणूक प्रशासनाच्या वतीने मतदानासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post