चार टेम्पो सह 60 लाख 72 हजाराचा मुद्देमाल हस्तगत .
प्रेस मीडिया :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
सुगंधित तंबाखू गुटख्याचा साठा जप्त चार टेम्पो सह 60 लाख 72 हजाराचा मुद्देमाल हस्तगत नवी मुंबई मापे एमआयडीसीतील गोदामात साठवलेली सुगंधी तंबाखू व पान मसाला टेम्पो मधून टेम्पो मधून सोप्या पद्धतीने विक्री करण्यासाठी नेणाऱ्या सात जणांच्या टोली ला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे
कारावाईत गुन्हे शाखेने तब्बल ४२ लाख ७२ हजार रुपये किमतीची तंबाखू व पान मसाल्याचा साठा तसेच १८ लाख रुपये किमतीचे ४ टेम्पो असा तब्बल ६० लाख ७२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी दिली. महापे एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-३ ला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त महेश घुर्ये व उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शत्रुघ्न माळी व त्यांच्या पथकाने शनिवारी रात्री महापे एमआयडीसीमध्ये सापळा लावला होता. पहाटेच्या सुमारास टाटा मोटर्स सर्व्हिस शोरूममधून चार टेम्पो संशयास्पदरीत्या बाहेर पडताना निदर्शनास आले.
पथकाने टेम्पोची तपासणी केली असता गुटखा आढळला. पोलिसांनी टेम्पो चालकांची चौकशी केली असता, त्यांनी गोदामाची माहिती दिली. गुन्हे शाखेच्या पथकाने गोदामाची तपासणी केली असता त्या ठिकाणी गुटख्याचा मोठ्या प्रमाणात साठा आढळला. कारवाईत इसरार अहमद नियाज अहमद शेख (४५), गुटख्याची वाहतूक करणारा सूरज हरीश ठक्कर (४१) तसेच गोदाम सांभाळणारा सस्तु रामेत यादव (३४) टेम्पो चालक नितीन बाबूराव कसबे (४१), नौरुद्दीन अलिशौकत सय्यद (२६), मोहम्मद नफिस रफिक शेख (३४), आणि पवनकुमार पन्नालाल श्रीवास्तव (२७) या सात जणांना ताब्यात घेतले. सर्वांविरोधात रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून चार टेम्पोसह ४२ लाख ७२ हजार रुपये किमतीची तंबाखू व पानमसाला असा एकूण ६० लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
एमआयडीसीतील गोदामात साठा कारवाईत अटक करण्यात आलेली टोळी सुगंधित तंबाखू व पानमसाला (विमल गुटखा) परराज्यातून छुप्या पद्धतीने कमी दरात खरेदी करून भाड्याने घेतलेल्या एमआयडीसीतील गोदामात साठा करून ठेवत असल्याचे आढळले. मध्यरात्री अथवा पहाटेच्या सुमारास छोट्या टेम्पोतून हा गुटखा नवी मुंबई, मुंबई व ठाणे परिसरातील व्यावसायिकांना जादा दराने विकला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.