स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर दरोडा

 चोरट्यांनी तब्बल 56 लाख रुपयांची रोकड लंपास केली 


प्रेस मीडिया ऑनलाइन :

  रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

   पेन शहरात गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे तर गेल्या काही महिन्यात शहरातील तरणखोप येथील घरात लाखो रुपयाच्या चोरीची घटना घडली होती तर पेन शहरातील मुख्य रस्त्यावर आठ दुकाने फोडली.

 नुकतेच शहरातील मुख्य रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर दरोडा टाकत चोरट्यांनी तब्बल 56 लाख रुपयांची रोकड लंपास केली केल्याने सर्वत्र जोरदार खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या ATM मध्ये सीसी टीव्ही  कॅमेरा, सुरक्षा रक्षक दोन्हीही नाहीत. त्या मुळे चोरट्यांना चोरी करणे सोपे गेले.

पेण शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या सनसिटी इमारतीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर दरोडा टाकत दरोडेखोरांनी 56 लाख 34 हजार 800 रुपये लंपास केल्याची घटना घडली. तर दरोड्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासणीकरता फॉरेन्सिक पथकही पाचारण केले होते. त्याचप्रमाणे दरोडेखोरांचा मागोवा घेण्यासाठी डॉग स्कॉडची मदतही घेण्यात आली.

मागिल काही दिवसांमध्ये पेण शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र अजूनही पोलिस चोरट्यांना पकडू शकले नाहीत. त्यातच आता चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून 56 लाखांची रक्कम लंपास केली आहे. तर गॅस कटर आणि गॅस टाकी एटीएममध्येच टाकून चोरट्यांनी पलायन केले आहे. मात्र शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असताना पोलिस चोरांना पकडू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाले आहे.

दरम्यान समोर आलेली धक्कादायक बाब म्हणजे एटीएमवर पडलेल्या दरोड्यामुळे बँक अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएममध्ये सीसीटीव्ही कॅमेराही लावला नसल्याचे समोर आले आहे. तसेच रात्रीच्या वेळी एटीएमवर सुरक्षा रक्षकही नेमला नव्हता. त्याचाच फायदा दरोडेखोरांनी घेत 56 लाखांना गंडा घातला. त्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पेण शाखेतील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरीकांकडून केली जात आहे.


बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी संपर्क साधा : 

85 30 83 87 12

Post a Comment

Previous Post Next Post