पनवेल मधील कुस्त्यांच्या दंगलीत नाशिकच्या बाळू बोरखेने बाजी मारली


विहिघर येथे मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम संपन्न 

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

 तालुक्यातील विहीघर साईबाबा मूर्ती स्थापना वर्धापन दिन सोहळा, सत्यनारायणाची महापूजा, तसेच चिपळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश पंढरीनाथ फडके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तसेच या कार्यक्रमांदरम्यान कुस्त्यांच्या दंगलीचे (स्पर्धेचे) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिक येथील बाळू बोरखे याने प्रथक क्रमांक पटकावला असून त्याला २५ हजार रुपये व चार फुटी मानाची गदा देऊन सन्मानित करण्यात आले. 

   विहीघर येथे नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ०१ जानेवारीला श्री साईबाबा मूर्ती स्थापना वर्धापन दिन व अभिषेक, कुस्त्यांच्या दंगली, श्री सत्यनारायणाची महापूजा, उपसरपंच मंगेश पंढरीनाथ फडके यांचा वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी ह.भ.प. शंकर महाराज आंग्रे आणि मंडळींचा त्रिवेणी संगम हरिपाठ शिवकर यांचे हरिपाठ, जय भवानी प्रासादिक भजन मंडळ वडगाव आणि श्री डांगर्णेश्वर सांप्रदायिक वारकरी भजन मंडळ मोरबे यांचे वारकरी जोड भजन झाले. या वेळी झालेल्या कुस्त्यांच्या दंगलींमध्ये नाशिक येथील बाळू बोरखे याने प्रथम क्रमांक पटकावला.  मालेगाव येथील सैफ अली याने द्वितीय क्रमांक पटकावला असून त्याला १५, हजार रुपये आणि तीन फुटी गदा, तर तृतीय क्रमांक पटकावलेल्या मनमाड येथील धर्मा शिंदे याला १० हजार रुपये आणि अडीच फुटी गदा देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचा रायगड जिल्हयातील नागरिकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, ओबीसी सेल उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, माजी सरपंच तथा महाराष्ट्र बैलगाडी शर्यत संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुमती फडके, गुरुनाथ फडके, चिपळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश फडके, अतुल भोईर, हिताश डेव्हलपर्सचे अक्षय फडके, उद्योजक संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेश काथारा, युवा कार्यकर्ते विश्वास पाटील, माजी सरपंच संदीप जळे, संदेश फडके, समीर खुटले, सरपंच अशोक गायकर, प्रशांत फडके, महेश म्हात्रे, शरद भगत, अविनाश शेळके, रेवन फडके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post