व्हेल माशाची उलटी विक्री करिता बेकायदेशीररीत्या बाळगल्या प्रकरणी तिघांना अटक

 5 कोटी 90 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला , मुरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रतिनिधी : सुनिल पाटील : 

 व्हेल माशाची उलटी विक्री करिता बेकायदेशीररीत्या बाळगल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 5 किलो वजनाची उलटी, दोन मोटार सायकल, असा 5 कोटी 90 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दर्पण रमेश गुंड (वय 38), खंडु थोरवे( वय 41), राजेंद्र जनार्दन ठाकुर (वय 50, तिघेही रा. मुरूड तालुका, रायगड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मुरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशीद येथे एका हॉटेलामध्ये व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस नाईक अक्षय जाधव यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. मुरूड रोडवरील गेस्ट हाऊसवर छापा टाकून तिघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे 5 किलो वजनाची व्हेल माशाची उलटी, दोन मोटार सायकल असा एकुण 5 कोटी 90 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाला सापडला. तीनही आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post