सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य सरपंचाच्या न्याय व हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना

 

प्रेस मीडिया वृत्तसेवा

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

महाड मधील आदीस्ते गावातील महिला सरपंच मीनाक्षी उनर खडमिडे यांचा विवस्त्र स्वरूपातील मृतदेह दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी  जंगलात आढळून आल्याने त्यांचा बलात्कार करून खून झाल्याची शक्यता असल्याची शक्यता होती....

सदर घटनेची माहिती मिळताच संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष सन्माननीय गणेश जगदिश राऊळ यांनी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र भागोजी टकले यांना संपर्क साधून प्रकरणाची माहिती घेण्यास सांगितले व त्या माहितीच्या आधारे महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना सदर जातीने प्रकरणात लक्ष घालून आरोपीस अटक करून शासन करणेबाबत दिनांक २८ डिसेंबर रोजी पत्र देण्यात आले त्यांनी सदर पत्राची तातडीने दखल घेऊन  उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय महाड यांना सदर प्रकरणात तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाही करण्याचे आदेश दिले असता महाड पोलिसांनी दिनांक २९ डिसेंबर रोजी आरोपीस अटक केली  व पुढील चौकशी सुरू आहे असे पत्राद्वारे कळवले

Post a Comment

Previous Post Next Post