रायगड मधून पहिली आंब्याची पेटी मुंबई बाजारात



प्रेस मीडिया वृत्तसेवा

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

  या वर्षी हंगामात रायगड जिल्ह्यातून मुंबई बाजारात पहिला आंबा पाठवण्यात मान आलिबाग तालुक्याला मिळाला आहे अलिबाग तालुक्यातील नारंगी येथील बागायतदार एस के. मँगोजचे मालक वरुण संजयकुमार पाटील यांनी प्रजासत्ताक दिनी प्रत्‍येकी दोन डझनाच्‍या पाच पेटयांची काढणी करुन आंबा मुंबई बाजारात पाठवला आहे.

यंदा देखील आंबा बागायतदारांवर निसर्गाने अवकृपा केली आहे. सातत्‍याने बदलत्‍या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसतो आहे. अवेळी पडणारा पाऊस , खराब हवामान ,पिकांवर येणारे आजार अशा प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन वरूण पाटील यांनी यशस्‍वीरित्‍या आंब्‍याची काढणी केली.


रायगड जिल्‍हयातून पहिला आंबा बाजारात पाठवण्‍याचा मान त्यांनी पटकावला आहे. हा आंबा त्‍यांना मुंबई कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या वाशी बाजारात पाठवला आहे. जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी उज्‍वला बाणखेले यांनी वरुण यांचे अभिनंदन करत त्‍यांना पुढील हंगामासाठी शुभेच्‍छा दिल्‍यात.

बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी संपर्क  :

 सुनिल पाटील : 8530838712

Post a Comment

Previous Post Next Post