ग्रामीण भागातील 130 किलोमीटरचे रस्ते होणार चकाचक



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील :

133 किलोमीटरचे रस्ते होणार चकाचक प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत 92 कोटी रुपयांचा निधी मंजूर वाढते औद्योगिकरण आणि पर्यटन असल्यामुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाहनांची वर्दळ वाढत आहे.

या पार्श्वभूमीववर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १३३ किलो मीटरचे रस्ते चकाचक करण्यात येणार आहेत. यासाठी ९२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या २६ कामांपैकी २१ कामांना मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत १५ तालुक्यांतील ग्रामीण रस्त्यांसाठी २६ कामांना मान्यता देण्यात आली.

या कामांसाठी ९२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. २६ कामांपैकी २१ कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामांची निविदा प्रक्रीया लवकरच सुरू करून कामांना सुरुवात होणार आहे. तर उर्वरित पाच कामांची मंजुरी घेण्याची प्रक्रीया सुरू आहे.

त्यामध्ये महाडमधील दोन, माणगाव दोन व पोलादपूर तालुक्यातील एका कामांचा समावेश आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यात १३३ किलो मीटरचे रस्ते होणार आहे. या रस्त्यांमुळे ग्रामीण भागातील पर्यटन व औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे. 

-- रस्त्यांच्या कामांवर दृष्टीक्षेप तालुके - कामे - पनवेल - ३ उरण - १ कर्जत - २ महाड - ३ माणगाव - ३ पोलादपूर - २ श्रीवर्धन - १ म्हसळा - १ तळा - १ पेण - १ सुधागड - २ रोहा - २ मुरुड - १ खालापूर - २ अलिबाग -१ ------------- एकूण - २६ ---------------

Post a Comment

Previous Post Next Post