प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते स्वर्गीय दि .बा.पाटील यांना आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांनी वाहिली आदरांजली




प्रेस मीडिया ऑनलाइन

रायगड जिल्हा प्रतिनिधी : सुनील पाटील

1984 च्या ऐतिहासिक उरण शेतकरी आदोलनाचे प्रणेते, प्रकल्पग्रस्तांचे नेते व सर्व सामन्य जनतेच्या मनातील लोकनेते *स्वर्गीय दि बा पाटील साहेब* यांच्या जयंती निमित्त गुरुवार दिनाकं 13 जानेवारी 2022 रोजी 

 *शिवसेना जिल्हप्रमुख मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर* यांनी स्वर्गीय दि बा पाटील साहेब यांच्या जासई या मूळ गावी जाऊन शिवसेनेच्या व तमाम  शिवसैनिक यांच्या वतीने अभिवादन करून भावपूर्ण आदरांजली वाहिली.

नवी मुंबई, सिडको व जे एन पी टी प्रकल्पग्रस्तांसाठी स्वर्गीय दि बा पाटील साहेब यांनी मोठा लढा दिला होता, त्यांच्या या लढ्यातून १२.५% विकसीत जमीन या संकल्पनेचा जन्म झाला व त्याचा फायदा शेकडो शेतकऱ्यांना झाला.

आज *स्वर्गीय दि बा पाटील साहेब* यांच्या जयंतीनिमित्त जिजामाता रुग्णालय, जासई येथे नव्याने  बांधण्यात आलेल्या अर्धपुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, तर दीप प्रज्वल *शिवसेना जिल्हप्रमुख मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर* यांच्या हस्ते करण्यात आले.




बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी संपर्क करा :

8430838713

Post a Comment

Previous Post Next Post