प्रेस मीडिया ऑनलाइन :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
राज्यात कोरोनाचा कहर वाढलेल्या पाहायला मिळत आहे दिवसेंदिवस कोरोनाचा शिरगाव वाढत आहे त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे यातच कोरोनाचा नवीन व्हेरीएन्ट ओमीक्रोन थैमान घालायला सुरुवात केली आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर नियमावली कडक करण्यात आली आहे. त्यामुळे आता निर्बंधांमध्ये सक्ती करण्यात आली असून राज्यात तुर्तास लाॅकडाऊन केलं नाही.राज्याची आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच मुंबईतील लोकल बाबत महत्त्वाची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मुंबईतील रुग्णांची संख्या वाढत असली तरी सध्या मुंबईतील लोकल सुरुच राहणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर मुंबईत लाॅकडाऊन लागणार नसल्याचंही टोपेंनी यावेळी सांगितलं.मुंबईतील रुग्णसंख्या पाहता सध्या सावधगिरी बाळगण्याची आणि काळजी घेण्याची गरज असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं आहे.
गेल्या चोवीस तासात मुंबईत 20 हजार 181 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येची आकडेवारी धडकी भरवणारी आहे.दोन्ही लसमात्रा घेतलेल्या सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वे प्रवासाची अनुमती असून लोकलप्रवासावर सध्या र्निबध घातले जाणार नाहीत, असे टोपे यांनी स्पष्टच सांगितलं आहे.मुंबईत गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. नववर्षापासून ते आतापर्यंत म्हणजेच 6 जानेवारीपर्यंत असलेली कोरोना आकडेवारी वाढत चालली आहे.कोरोना रुग्णांची संख्या जशी वाढतेय, तशी मृतांची संख्याही मन हेलवणारी आहे. अशातच कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्राॅनचाही संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे निर्बंध घालणं सक्तीचं झालं आहे.