प्रेस मीडिया :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणारे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी पनवेल भाजपच्या वतीने पनवेल तालुका पोलीस ठाणे यांच्याकडे करण्यात आली आहे.
भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या युवा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना या संदर्भात निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली आहे. या शिष्टमंडळात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, विश्वजित पाटील, रोहित घरत, अंकुश पाटील यांचा समावेश होता.
दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केले होते. पटोले यांनी (मोदींना मारू शकतो आणि मोदीला शिव्या देऊ शकतो) असे बेताल वक्तव्य एका कार्यक्रमात केले होते. देशाचे पंतप्रधान हे संपूर्ण भारताचे नेतृत्व करणारे सक्षम पंतप्रधान व्यक्ती आहेत. पंतप्रधान हे भारताचे सर्वोच्च पद आहे आणि या पदाचा आपण अभिमान राखला पाहिजे.त्यांच्या विरोधात असे बेताल वक्तव्य करणे हे देशद्रोही कृत्य आहे. मात्र नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य अत्यंत निंदाजनक आहे, त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल ग्रामीण मंडल तर्फे पनवेल तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन पंतप्रधानांविरुद्ध बेताल वक्तव्य करणारे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा 8530838712