अलिबागच्या विधिज्ञ् नईमा घट्टे यांच्या पनवेल कार्यालयाचे परेश ठाकूर यांच्या हस्ते उदघाट्न



प्रेस मेडिया ऑनलाइन :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील


अलिबागच्या युवा विधिज्ञ् नईमा इमरान घट्टे यांच्या पनवेल मधील नव्या कार्यालयाचे उदघाट्न पनवेल महानगर पालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक उपस्थित होते.

   पनवेल न्यायालयात होणाऱ्या कामकाजमध्ये असंख्य प्रकरणे असतात. गोरगरीब नागरिक ग्रामस्थ तसेच विविध लोकांना कायदेशीर प्रक्रियेत या कार्यालयाचा उपयोग होईल असे मत परेश ठाकूर यांनी व्यक्त केले. प्रशांत नाईक यांनी देखील शुभेच्छा पर विचार मांडले.  यावेळी भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड प्रभारी सय्यद अकबर,पनवेलचे नगरसेवक मुकीत काझी, भाजपचे इफ्तीकार अत्तार, कैसर दणदणे, उरणच्या माजी उपनगराध्यक्ष नाहिदा ठाकूर, रशीद ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.इमरान घट्टे यांनी सर्वांचे स्वागत व आभार प्रदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post