रायगड जिल्ह्यातील पेन शहरातील दुकान फोड्या करणारे तीन चोरट्यांच्या मुस्क्या आवळ्या



प्रेस मीडिया ऑनलाइन :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

  गेल्या महिन्यात डिसेंबर मध्ये पेण शहरात एकाच रात्री मध्ये आठ दुकाने फोडण्यात आलेल्या गुन्ह्यातील तीन आरोपींना पेन पोलिसांना अटक करण्यात चांगले यश आले आहेत त्यांना आज न्यायालयात हजर केले असता २५ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या कडून मुद्देमाल ही जप्त करण्यात आले आहे.



पेण शहरातली पेण खोपोली मार्ग वरील जलाराम मेडीकल स्टोअर्स, डिमेलोज केक शॉप, साई राज स्वीट मार्ट, रिंगरोड स्टोअर, स्वरा कलेक्शन, चिंतामणी जनरल स्टोअर, चावडीनाका येथील आईस्क्रीम पार्लर व मोबाईल शॉपी या आठ दुकानांचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी १२ डिसेंबरच्या मध्यरात्री ३६ हजार रुपये रोख रक्कम व एक मोबाईल असा ऐवज घेऊन पोबारा केला होता. दुकानांचे शटर वाकवून चोरी करणारे चोरटे हे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते.

१९ ते २२ वर्षीय चार चोरटे शटर वाकवताना व चोरी करताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असताना सुध्दा त्यांचा तपास लागत नसल्याने पेण पोलिसां समोर चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. या बरोबरच याच पेण खोपोली मार्गावरील एसबीआय बँकेचे एटीम वर दरोडा टाकून ५६ लाख ३४ हजार ८०० रुपये घेऊन गेल्याने पेण पोलिसांवरील दबाव वाढला होता.

अखेर अथक प्रयत्न करुन पेण पोलिसांनी डिसेंबर महिन्यात झालेल्या आठ दुकानातील चोरी प्रकरणी रवी तानाजी धनगर ( वय १९ वर्षे, रा.आंबिवली-कल्याण), राज विजय राजापूरे ( वय २१ वर्षे, रा.मध्यप्रदेश-इंदोर ), सुनील राम धरणगोयल ( वय १९ वर्षे, रा.आंबिवली-कल्याण ) या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या घटनेतील चौथा संशयित आरोपी बाळकृष्ण पाल हा ठाणे,नौपाडा येथे अटक आहे.

या आरोपींना पेण न्यायालयात आज हजर केले असता त्यांना २५ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपीं कडून ५ हजार ३०० रुपये रोख रक्कम व चोरीतील मोबाईल जप्त करण्यात आले आहे. तसेच या आरोपींनी पेण येथून चोरी केलेली मोटार सायकल चोरी केल्याचा गुन्हा व नेरळ शहरात चोरी केल्याचा गुन्हा कबूल केला आहे.

या प्रकरणी रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे, विभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीमती मीनल शिंदे या अधिक तपास करत आहेत.


बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा 85 30 83 87 12

Post a Comment

Previous Post Next Post