कर्जत खोपोली रस्त्याचे रखडलेले काम आपल्या मालिकीच्या जागेतून नेण्यास दिली सहमती.
अपघातांची मालिका खंडित होणार.
प्रेस मीडिया ऑनलाइन :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
कर्जत खोपोली या दोन्ही शहरांना जोडणारा मार्ग निर्माण होत असताना जांबरुंग फाटा या ठिकाणी शेतकरी आणि शासन यांच्या समन्वयात अडचण निर्माण झाली आणि आर्थिक देवाणघेवाणीत अडचणी आल्या. या कारणे रस्त्याचे रुंदीकरण थांबले होते. त्या ठिकाणी अर्धवट परिस्थितीत असलेले निर्माण काम कित्येक महिने वारंवार अपघाताना कारणीभूत ठरत होते किंबहुना अपघातांची मालिका संपतच नव्हती. सामाजिक कार्यकर्ते मुस्तुफा आणि इकबाल दुस्ते बंधूंनी पुढाकार घेऊन होणारे अपघात टाळण्यासाठी तथा वाहतुकीची अडचण दूर व्हावी या हेतूने आपल्याला मोबदला मिळेल न मिळेल किंवा त्या मधल्या तांत्रिक बाबींचा उलगडा कधी होईल न होईल, याची वाट न पाहता बिनशर्त रस्त्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी परवानगी दिली आहे.
आता लवकरच कर्जत खापोली रस्ता पूर्णत्वास येईल.
मुस्तुफा दुस्ते हे सामाजिक स्तरावर कार्यरत असतात त्यातही ते अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे क्रियाशील सदस्य आहेत. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे. या मार्गाचे काम युद्ध स्तरावर सुरू झाले आहे.