पातळगंगा नदीचे पाणी दूषित होऊ लागले..

 पर्यावरण विभाग मंत्री कारवाई करतील का...


प्रेस मीडिया वृत्तसेवा

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :  सुनील पाटील


 कंपनीमार्फत होणाऱ्या प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असेल आणि याबाबत चौकशी केल्यानंतर हे सिद्ध होत असेल तर अशा कंपनीवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत दिली.


रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील पाताळगंगा औद्योगिक वसाहती ओल्ड पातळगंगा एमआयडीसी च्या हद्दीत बसलेल्या कंपन्या एमआयडीसीने केलेली गटार त्याच्यात राजरोसपणे पाणी केमिकलयुक्त पाणी सोडला जात आहे  राजरोसपणे केमिकलयुक्त पाणी सोडत असून महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाचा दुर्लक्ष .असल्या बाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य महेश बालदी, आणि प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित मुद्दा केला होता पण आता पाताळ गंगा नदीची अवस्था बिकट झाली असून संबंधित आमदार यांनी जातील लक्ष टाकावा त्वरित कारवाई करावी.

 रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जातीने लक्ष टाकून पातळ गंगा नदी मध्ये ओल्ड पातळगंगा बसलेल्या कंपन्या राजरोसपणे सांडपाणी केमिकलयुक्त गटारां मध्ये सोडून ते पाणी पाताळगंगा पात्रात जाऊन नदीचे पाणी दूषित झाले आहे . पर्यावरण मंत्री ठाकरे म्हणाले की, रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार या परिसरात श्वसन विकार, नेत्र रोग, त्वचा रोग इत्यादी रोगांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, ही रुग्णवाढ या कंपनीमुळे होत असलेल्या प्रदुषणामुळेच होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलेले नाही. तरी सुद्धा  याबाबत तपासणी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे ठाकरे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post