जे एन पी टी विद्यालयातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा
प्रेस मीडिया ऑनलाइन :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
बुधवार दि. १२/१/२०२२ रोजी *मा आमदार मनोहरशेठ भोईर* यांच्या नेतृत्वाखाली जेएनपीटी येथ झालेल्या बैठकीमध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयातील गेले अडीच वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली, पालक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आंदोलन च्या अनुषंगाने दि. २४/१२/२०२१ रोजी जेएनपीटी चे उपाध्यक्ष श्री उन्मेष वाघ यांच्या समवेत माजी आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित शिष्टमंडळा बरोबर झालेल्या चर्चेअंती श्री उन्मेष वाघ , डेप्युटी चेअरमन, जेएनपीटी यांनी दिलेल्या सुचनेनुसार आज जेएनपीटी चे चीफ मॅनेजर ॲडमिनिस्ट्रेशन श्री. ढवळे प्रशासकीय अधिकारी श्री. मोरे तसेच आर के एफ मॅनेजमेंट चे कायदेशीर सल्लागार यांच्या समवेत बैठक झाली.
पालक , शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सर्व मुद्यांवर सकारात्मक चर्चा होवून संस्थेच्या हस्तांतरणा बाबत महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी पारीत केलेले शासन निर्णयानुसार या पूर्वी जसे IES संस्थेने शासकीय नियमानुसार वेतना निश्चिती करून पुर्वलक्षी प्रभावाने देण्याच्या अटीला अधिन राहून दिलेल्या सम्मती पत्राचे वाचन करुन हस्तांतरण करण्यास एक मताने आर के एफ सह जेएनपीटी च्या अधिकारी यांनी मंजुरी दिली तसेच इतर सर्व विषय हस्तांतरण झाल्यावर प्राधान्याने करण्याचे मान्य केले.
या वेळी मा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक नेते नरसू पाटील, जेएनपीटी चे विश्वस्त काॅ. भूषण पाटील, विश्वस्त दिनेश पाटील, जि प सदस्य विजय भोईर, पं स सदस्य दिपक ठाकूर , उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार, कामगार नेते संदिप पाटील सुरेश पाटील , पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष किरण घरत, योगेश ठाकूर तसेच मुख्याध्यापक रमाकांत गावंड , गिरीश पाटील, प्रमोद कांबळे ईतर शिक्षक उपस्थित होते.